आपल्या महानगरपालिका विषयी

उदुंबरावती हे अमरावतीचे प्राचीन व मुळ नांव, औदुंबर वृक्षाच्या सानिध्यात वसल्यामुळे या वस्तीस उदुंबरावती हे नांव मिळाले यापासुन उंबरावती हा प्राकृत शब्द निर्माण होऊन पुढे बोली भाषेत उमरावती असा उच्चा्र होऊ लागला ब्रिटीशांच्या काळांत उमरावती हे अमरावती झाले. श्रीकृष्णाने जेथुन रुक्मिणीचे हरण केले ते अंबेचे देऊळ म्हणजेच येथील जगदंबेचे मंदिर होय अशी आख्यायिका प्रचालित आहे. इंग्रज राजवटीत, विशेषत इ स 1859 ते 1871 या काळांत सर्वच दृष्टीने अमरावतीची भरभराट झाली. अमरावती महानगरपालिका 15 ऑगस्ट 1983 रोजी स्थापन झाली यात पुर्वीचे अमरावती व बडनेरा नगरपालिका क्षेत्र तथा 18 महसुल खेडयांचा समावेश करण्यात आला. सन 1981 मध्ये 5 स्वतत्रं महसुल विभाग उघडून त्याचे मुख्यालय अमरावती येथे स्थापण्यात आले.

अधिक वाचा